मारुती मंदिर येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यावर गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर परिसरातील स्टेडियम लगलच्या परिसरात दारु पिणाऱ्या संशयितावर शहर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. हेमंत हनुमंत देवकर (२८) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी दारुच्या बाटल्या हस्तगत केल्या, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

शहरातील विविध भागात पोलिसांकडून गस्त घालण्यात येत होती. ५ फेब्रुवारी रात्री ८ च्या सुमारास संशयित आरोपी हा रात्री ८ वाजण्याच्या सुमारास मारुती मंदिर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमलगतच्या भागात दारु पिण्यासाठी बसलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी शहर पोलिसांकडून संशयिताविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.