मारुती मंदिर येथे भररस्त्यात मनोरुग्ण महिलेचा धिंगाणा

रत्नागिरी:- भर दिवसा दुपारच्या सुमारास शहरातील मारुती मंदिर परिसरात मनोरुग्ण महिलेचा राडा घातला. कोणतीही विचारणा न करताच दोन तीन स्वारांना चोप दिला. काही गाड्यांचे नुकसानही केले. नागरिकांनी या राड्याची खबर शहर पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी त्या मनोरुग्ण महिला ताब्यात घेतले.

ही घटना शुक्रवारी (ता. १९) दुपारी दीड दोनच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ताब्यात घेतलेली ही
महिला मनोरुग्ण शहराजवळच्या एका गावातील असल्याचे सांगितले. ज्यांनी-या महिलेला पाहिले त्यांनी ती सुशिक्षित असल्याचे भासत असल्याचे सांगितले. दुपारी मारुती मंदिर येथे जाणाऱ्या एका तरुणाला त्याने धरले. त्याच्या गाडीवर लाथ मारुन पॅनलचे नुकसान केले. तसेच मारहाण केली. अचानक घडलेल्या प्रकाराने तरुणही हबकला कारण वेडसर म्हणावे तर तिचा पेहराव सुशिक्षीत महिले सारखा होता. पण त्याच्याशी वाद सुरु असतानाच त्याच्या मागून येणाऱ्या आणखी दोन वाहन चालकाना तीने
दटावले दगड मारण्याचा प्रय़त्न करत होती. त्यामुळे वाहन चालकांची गर्दी झाली. वाहतूक अर्धा ते एकतास खोळबली होती.

जमलेल्या वाहन चालक व नागरिकांनी तत्काळ शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. खबर मिळताच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्या मनोरुग्ण महिलेला ताब्यात घेऊन शहर पोलिस ठाण्यात महिलेला घेऊन येत असताना त्या महिलेने गाडीतून
उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. मनोरुग्ण महिलेचे नातेवाईक पोलिस ठाण्यात दाखल झाल्यावर तिला येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र वाहनांचे नुकसान झालेल्या तरुणांना शहर पोलिस ठाण्यात तक्रार न देताच परत फिरावे लागले आहे. त्या महिलेच्या नातेवाईकांनी नाहक त्रास देणाऱ्या त्या महिलेचा बंदोबस्त करावा अशी मागणी नुकसान झालेल्या वाहन चालकांमधून करण्यात येत आहे.