मारुती मंदिर येथे बंगला फोडून लाखोंचा ऐवज लांबवला

रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर भागातील बंद बंगला फोडून चोरट्याने लाखो रुपयांचा ऐवज लांबवल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घरमालक परत आल्यानंतर चोरीची घटना उघड झाली. चोरी करणारा चोरटा सीसीटिव्ही त कैद झाल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी या प्रकरणी तपासाची चक्रे फिरवली आहेत.

२१ सप्टेंबर रोजी घडलेली चोरीची हि घटना काल उघडकीस आली आहे. घरमालक आपले घर बंद करून बाहेर गेले होते. काल पुन्हा घरी आल्यावर त्यांच्या निदर्शनास हि बाब आली. तत्काळ त्यांनी पोलिसांना कळवले.

आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दिनांक २१ च्या पहाटे ३ च्या सुमारास एक व्यक्ती बंगल्यात शिरताना दिसत असून हि व्यक्ती तब्बल दोन तासानंतर बाहेर आल्याचे दिसत आहे. मारुती मंदिर येथील गांधी यांचा हा बंगला आहे. हा बंगला फोडून चोरट्याने चांदीच्या वस्तू व रोख रक्कम चोरून नेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. भर वस्तीत झालेल्या या चोरीने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. २१ रोजी घडलेली हि घटना २६ तारखेला समोर आली आहे. या घटनेबाबत पोलीस आता अधिक तपास करीत आहेत.