रत्नागिरी:- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सवांद दौऱ्यामुळे जमा होणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे आठवडा बाजार ते घुडेवठार मार्ग तर श्री विठ्ठल मूर्तीच्या अनावरणासाठी सुमारे तीन हजार वारकरी येणार असून त्यांची दिंडी मारुती मंदिर ते शिर्के उद्यान, माळनाका अशी होणार आहे. या दिंडीकरिता वाहतुकीची कोंडी होवू नये म्हणून आज 2 ते 5 वाजेपर्यंत मारुती मंदिर ते जेलनाका दरम्यान एकदिशा मार्ग सर्व वाहनांना बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.
या आदेशात म्हटले आहे, रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील तारांगणा शेजारील शिर्के उद्यानाचे सुशोभिकरण करणे या विकास कामाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होत आहे. श्री विठ्ठल मूर्तीच्या अनावरणासाठी सुमारे 3 हजार वारकरी येणार आहेत. त्यांच्या दिंडीकरिता वाहतुकीची कोंडी होऊ नये याकरिता दुपारी 2 ते 5 दरम्यान मारुती मंदिर ते जेलनाका वाहनाना एकदिशा मार्ग असा वाहतुकीसाठी बंद करण्याबाबत रत्नागिरी नगरपरिषदेकडून पत्र प्राप्त झाले आहे. या मार्गात पर्यायी मार्ग म्हणून परटवणे मार्गे साळवी स्टॉप असा उपलब्ध आहे.
वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये या करिता 5 फेब्रुवारी रोजी मारुती मंदिर ते जेलनाका दरम्यान एक दिशा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात यावा. वाहतुकीची कोंडी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता योग्य नियोजन करण्यात यावे. वाहतूक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 116 प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारण्याची कार्यवाही पोलीस विभागाने करावयाची आहे, असेही आदेशात नमूद आहे, असे आदेशात म्हटले आहे.
या शिवाय माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे 5 फेब्रुवारी रोजी जिल्हा दौऱ्या दरम्यान शिवसेना जिल्हा कार्यालयासमोरील रोडवर संवाद कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमाकरिता मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घुडेवठार व पाटीलवाडी रोडकडून आठवडा बाजार चौकाकडे येणाऱ्या वाहनांमुळे गर्दी होवून आठवडा बाजार रोड कडून विक्रम जैन यांच्या घराकडे जाणाऱ्या रोडवर अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या वाहनांचा ताफा थांबणार असल्याने या ठिकाणावरुन इतर वाहने सोडल्यास गर्दी होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो.
घुडेवठार व पाटीलवाडीकडून आठवडा बाजार चौकाकडून येणाऱ्या वाहनांना तसेच आठवडा बाजार रोडकडून विक्रम जैन यांच्या घराकडे जाणाऱ्या रोड इतर वाहनांना प्रवेश बंद करण्याबाबत व तसेच रस्त्यास पर्यायी मार्ग म्हणून तेलीआळी नाका ते जुने वाहतूक शाखा कार्यालय ते गुढे वठार असा मार्ग उपलब्ध आहे.
वाहतूक कोंडी टाळण्याकरिता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता 5 फेब्रुवारी रोजी आठवडा बाजार ते घुडेवठार दरम्यान सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात यावा. वाहतुकीची कोंडी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता योग्य नियोजन करण्यात यावे. वाहतूक नियमनाबाबत जनतेस माहिती मिळावी यादृष्टीने मोटार वाहन अधिनियम 1988 कलम 116 प्रमाणे वाहतुकीची चिन्हे उभारण्याची कार्यवाही पोलीस विभागाने करावयाची आहे, असेही आदेशात नमूद आहे.