मारुती मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्या चोरट्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी

रत्नागिरी:- काही दिवसांपूर्वी शहरतील मारुती मंदिर येथील दान पेटी फोडून ८४ हजार ५८८ रुपयांचा मुद्देमाल लांबवणाऱ्या आरोपीची न्यायालयाने सोमवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

विजय रमनेवल प्रजापती (३०, सध्या रा. कोकणनगर मूळ रा. उत्तरप्रदेश) त्याने शनिवार २७ जानेवारी रोजी पटाटे ३ वाजण्याच्या सुमारास मारुती मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लांबवली होती.

ही बाब तेथील सीसीटीव्ही फूटेजमध्ये कैद झाली होती. त्यावरुन शहर पोलिसांनी विजयचा शोध घऊन अटक करण्यात आली. या प्रकरणी सोमवारी संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.