मारहाण प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरानजीकच्या भाट्ये येथे किरकोळ कारणातून बहिण भावास शिवीगाळ  व मारहाण केल्याप्रकरणी एकाच घरातील तिघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी दुपारी 11 वा.सुमारास घडली.

गुलरेज होडेकर,निरजा होडेकर आणि इर्शाद होडेकर (सर्व रा.भाट्ये, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात मकदुमा निसार भाटकर (40,रा.भाट्ये, रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानूसार,त्या आणि संशयित हे एकमेकांचे शेजारी-शेजारी आहेत. होडेकर यांच्या घराचे काम सुरु असून शनिवारी ते आपल्या घरातील माती टेम्पोमध्ये भरत होते.त्यावेळी माती शेजारी राहणार्‍या भाटकर यांच्या घरात उडाल्याने त्यांनी याबाबत होडेकर यांच्याकडे जाब विचारला. याचा राग आल्याने संशयितांनी मकदुमा भाटकर आणि त्यांचा भाउ नवनिहाल भाटकर यांना शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी अधिक तपास पोलिस हेड काँस्टेबल झोरे करत आहेत.