चिपळूण:- तालुक्यातील परशुराम घाटातील मारहाण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीन संशयितांना तब्बल ६७ दिवसांनी जामीन मंजूर झाला. ही घटना ६ डिसेंबर रोजी घडली होती.
निहाल सईद अलवारे, शहबाज सिद्दीक दळवी, मुजफ्फर ईनामदार अशी या तिघांची नावे आहेत. या प्रकरणी १० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यापैकी तिघांना पोलिसांनी तत्काळ अटक केली होती. मात्र, या तिघांना नाहक गोवल्याचा आरोप करीत पालक, नातेवाइकांनी उपोषणाचा इशारा दिला होता. हे उपोषण आता स्थगित झाले आहे. अन्य दोघे फरार आहेत.