रत्नागिरी:- विरोध करणाऱ्यांच्या यापूर्वी चौकशा लावल्या जात होत्या. जेल मध्ये टाकले जात होते. मात्र आता विरोधकांचा आवाज कायमचा बंद करण्यासाठी खून केला जाईल हे या घटनेतून प्रकर्षाने पुढे आले. माणसं संपवण्यासाठी हे सरकार सत्तेवर आल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मला देखील तूरुंगात मारण्याचा प्रयत्न केला होता. माणसं संपवण्यासाठी हे सरकार आलंय
अशा प्रकारे महारष्ट्र चालणार नाही असे त्यांनी सांगितले. शेतकरी, मच्छीमार यांच्या प्रेतावरून प्रकल्प नाही होणार असे ते म्हणाले. शशिकांत वारीशे यांची हत्या ही राजकीय हत्या आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला.