रत्नागिरी:- मालकाच्या घरात कोणीच नाही याचा फायदा घेत माडकर्याने मालकाच्या घरातून ५० हजार रूपयांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार मावळंगे-गझनेवाडी येथे घडला आहे. याप्रकरणी तुरई नामक माडकर्याविरोधात पूर्णगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुप्रिया सत्यवान गझने (वय ४५, रा. मावळंगे, गझनेवाडी) यांचा माडी विक्रीचा व्यवसाय आहे. माडावरील माडी काढण्यासाठी त्यांनी तामिळनाडू येथील तुरई नामक माडकरी कामाला ठेवला आहे. या माडकर्याचे सुप्रिया यांच्या घरी नियमित येणेजाणे होते. १३ सप्टेंबर रोजी सुप्रिया यांचे पती व मुलगा हे दोघे दुपारच्या सुमारास कामानिमित्त घराच्या दरवाजाला कडी लावून शेतात गेले होते. सायंकाळी ५.३० वाजता ते दोघे घरी आले. त्यानंतर सुप्रिया यांचा मुलगा जिन्नस आणण्याकरिता जाणार होता. त्यासाठी तो घरात कपाट उघडण्यास गेला. त्यावेळी त्यांच्या कपाटात ठेवलेले ५० हजार रूपये त्याला दिसून आले नाहीत.
घरातील पैसे गायब झाल्याने त्यांनी माडकरी तुरई यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी गझने यांचा फोन उचलला नाही. त्यामुळे त्यांचा संशय अधिकच बळावला. याप्रकरणी सुप्रिया सत्यवान गझने यांनी पूर्णगड पोलीस स्थानकात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसंानी तुरई यांच्याविरोधात भादंविक ३८१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास पोहेकॉ धातकर करीत आहेत.