रत्नागिरी:- सॅटेलाइट टॅगिंग केलेली चार ऑलिव्ह रिडले कासवांपैकी दोन सिंधुुदुर्ग किनार्याजवळ आहेत तर सावनी आणि रेवा ही दक्षिणेकडे कर्नाटक किनारपट्टीवर सध्या ती संलग्न क्षेत्रातच असल्याचे दिसत आहे. पावसाळ्यामध्ये खाद्य मिळणार्या भागात ही कासवं विशिष्ठ प्रदेशात वास्तव्य करुन राहत असावीत असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे पावसाळ्यातील तिन महिन्यातील त्यांचा प्रवास पाहणे रंजक ठरणार आहे.
कोकण किनारपट्टीवर अनेक ठिकाणी ऑलिव्ह रिडले जातीची कासवं अंडी घालण्यासाठी येतात. गेल्या काही वर्षांत त्यांचे प्रमाण वाढले आहे. ही कासवं एका किनार्यावर अंडी घालून गेली की, त्यांचा पुढील प्रवास कसा होतो यावर अजूनपर्यंत अभ्यास झालेला नव्हता. यासाठी वनविभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानमार्फत वेळास, आंजर्ले, गुहागर किनार्यांचा पाच कासवांना सॅटेलाइट टॅगिंग करण्यात आली. गेल्या पाच महिन्यात त्यांच्या पाचपैकी चार कासवांवर लक्ष ठेवणे शक्य होत आहे. प्रथमा आणि वनश्री सध्या सिंधुदुर्गच्या किनार्यापासून जवळच स्थिरावलेली आहेत. प्रथमा दीवच्या किनार्यावरून गुजरातच्या पाण्यात गेली होती. पण नंतर ती दक्षिणेकडे वळली आणि पुन्हा महाराष्ट्राच्या पाण्यात शिरली. सध्या ती सिंधुदुर्गच्या किनार्यावर सापडली. वनश्री हळूहळू दक्षिणेकडे सरकत असून ते सध्या सिंधुदुर्ग किनारपट्टीवर आहे. रेवाने जवळजवळ दक्षिण कर्नाटकच्या पाण्यापर्यंत प्रवास केला होता; परंतु आता ती उत्तरेकडे वळली आहे आणि ती अजूनही कर्नाटकच्या किनार्यावरील समुद्राच्या पाण्यात आढळू शकते. सावनीने दक्षिणेकडे प्रवास सुरू ठेवला असून सध्या कर्नाटकच्या किनारपट्टीच्या समुद्राच्या पाण्यात आढळू शकते. ही कासवे गेल्या आठवडाभरात फारशी हलली नाहीत आणि सध्या ते संलग्न क्षेत्र असलेल्या प्रदेशात ते वास्तव्याला आहे. महाराष्ट्रात सध्या पावसाळा सुरू होत आहे. या कालावधीत ही कासंवे प्रवास करता किंवा नाही हे पाहणे निरीक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.