रत्नागिरी:- शहरातील मांडवी बीच येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. रोहित संतोष चव्हाण (२६, रा. खालची आळी, रत्नागिरी) व परिमल महेंद्र मायनाक (वय २८, रा. खालची आळी रत्नागिरी) अशी संशयित तरुणांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित गुरुवारी (ता. ६) रात्री पावणेआठच्या सुमारास सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच मांडवी बीच येथील नाईक फॅक्टरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उघड्या जागेवर मद्यपान करताना पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल कौस्तुभ जाधव व प्रतीक कांबळे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. नवीन वर्षआरंभापासून पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर मोहीम उघडली 5 आहे. यामुळे तरुणांना शिस्त लागेल, • असे बोलले जात आहे.