रत्नागिरी:- शहरातील एका महिला आश्रमात टिव्ही शोकेशवर ठेवलेले कपडे खाली पडल्याच्या संशयाने मारहाण झाली. संशयित महिलेने एका महिलेला चावा घेतला तर दुसरीच्या डोक्याला दरवाजा लागून किरकोळ जखमी झाली. ही घटना शुक्रवारी (ता. २२)
सकाळी आठच्या सुमारास आश्रमात घडली.
संशयित महिलेने टिव्ही च्या शोकेशवर कपडे ठेवले होते. पुन्हा ती त्या ठिकाणी आली तेव्हा ते कपडे खाली पडले होते. त्याचा राग मनात धरुन त्या महिलेने दुसऱ्या दोन महिलांना जाब विचारताना एकीला
चावा घेतला तर एकीच्या डोक्याला दरवाजा लागल्याने ती जखमी झाली. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर त्यांना सोडून देण्यात आले.