रत्नागिरी:- रत्नागिरी पटवर्धनवाडी येथील रहिवासी व महावितरण मधील माजी कनिष्ठ व्यवस्थापक गजानन बोरगावकर यांचे जेष्ठ पुत्र अमित गजानन बोरगावकर (वय-४१, रा. रत्नागिरी) यांचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले.
अमित बोरगावकर यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण सिंधुदुर्ग मध्ये झाले. उत्कृष्ट बॅडमिंटनपटू म्हणून ते ओळखले जात. शालेय जीवनात अमित याने राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धेत यश मिळवले होते. आधी सिंधुदुर्ग आणि गेली काही वर्षे ते रत्नागिरी येथे वास्तव्यास होते. अमित बोरगावकर यांचे पदवीचे शिक्षण रत्नागिरीतच पार पडले. यानंतर त्यांनी रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली येथे खासगी कंपनीत उच्च पदावर काम पाहिले.
रविवारी सायंकाळी दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. सोमवारी चर्मालय, रत्नागिरी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचा मित्र परिवार, नातेवाईक उपस्थित होते. त्यांच्यामागे आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.