महावितरणचा दर्जेदार सुविधांसाठी ९६६ कोटींचा प्रस्ताव

रत्नागिरी:- महावितरण कंपनीने वीज वितरणचे जाळे अधिक मजबूत आणि ग्राहकांना चांगल्या दाबाने विद्युत पुरवठा करण्यासाठी नव्याने ९६६ कोटींचा प्रस्ताव पाठवला आहे. यामध्ये २१ नवीन उपकेंद्रांचा प्रस्तावासह २८ हजार नवीन विद्युत खांबांचा समावेश आहे. यामुळे महावितरण ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याच्या उद्देसाने पावले टाकत आहे.

नवीन प्रस्तावातील पायाभूत सुविधा कार्यन्वित झाल्या महसुल देणाऱ्या घरगुती, वाणिज्य तसेच औद्योगिक
ग्राहकांची विनाव्यत्यय वीज वितरण करणे शक्य होणार आहे. जिल्ह्यात महावितरण कंपनीची ५५ उपकेंद्र आणि १९५ फिडर्स आहेत. त्यांच्या माध्यमातून सुमारे ६ लाख ग्राहकांना विद्युत पुरवठा केला जातो. परंतु जिल्ह्याची भौगोलिक परिस्थितीमुळे आणि दरीखोऱ्यातील, चढ-उताऱ्यामुळे उपकेंद्रातील अंतर १०० मीटरच्या दरम्यान आहे. या अंतरामुळे एका उपकेंद्रावरील त्या परिसरातील ग्राहकाचा अतिरिक्त लोड येतो. त्यामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणे, कमी दाबाने विद्युत पुरवठा होणे, अशा अनेक अडचणी निर्माण होतात. महावितरण कंपनीच्या लाईमनचेही काम वाढते. गेल्या काही वर्षांपासूनच्या जिल्ह्यातील या समस्येवर तोडगा काढण्याचा निर्णय महावितरण कंपनीने ९६६ कोटींचा नवीन प्रस्ताव शासनाला पाठवला आहे. यामध्ये जिल्ह्यात नवीन २१ उपकेंद्र उभारण्याचा येणार आहेत. १०० मीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतर असलेल्या भागात ही उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. त्यामुळे अंतर कमी होऊन ग्राहकांची संख्या मर्यादीत राहिली. त्यांना योग्य दाब आणि विनाखंडित विद्युत सेवा देता येईल, हा कंपनीचा उद्देश आहे. तसेच अनेक ठिकाणी विद्युत खांब गंजलेले आहेत. खराब झालेले आहेत. यामुळे अपघात होण्यापासून ग्राहकांना विद्युत सेवा देण्यामध्ये अडचणी निर्माण होता. म्हणून २८ हजार नवीन विद्युत खांब खरेदी केले जाणार आहेत.