रत्नागिरी:- शहरातील जे.के.फाईल्स कंपनीनजिक भाजपने उभारलेल्या महायुती प्रचार कार्यालयाचा शुभारंभ सोमवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवसेनेसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सोहळ्याकडे पाठ फिरवली होती. यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित म्हणाले, वरिष्ठांच्या आदेशामुळे निमंत्रण असुनही आम्ही सोहळ्याला गेलेलो नाही. परंतु लवकरच सर्वांच्या उपस्थितीत त्याच कार्यालयाचा शुभारंभ आम्ही करणार असल्याचे श्री.पंडित रयांनी सांगितल्यामुळे भाजपा कार्यकर्ते त्यांनी उभारलेल्या कार्यालयाचा पुन्हा शुभारंभ करायला शिवसेनेला परवानगी देणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.