रत्नागिरी:- काल दिनांक 12 मे रोजी झालेल्या ऑनलाईन बैठकीत मराठी पत्रकार परिषद तालुका रत्नागिरीच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी आनंद तापेकर तर सचिव म्हणून जमीर खलफे यांची नेमणूक करण्यात आली.
आज झुम ॲपद्वारे घेण्यात आलेल्या मिटींगमध्ये मराठी पत्रकार परिषद राज्य कार्यकारिणी सदस्य जान्हवी पाटील, जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण देवरुखकर, कार्याध्यक्ष राजेश शेळके, माजी जिल्हाध्यक्ष हेमंत वणजू यांच्यासह इतर सदस्यांच्या उपस्थितीत मराठी पत्रकार परिषद तालुका रत्नागिरीची नवीन कार्यकारणी निवडण्यात आली.
नवनियुक्त कार्यकारिणीत अध्यक्ष आनंद तापेकर , उपाध्यक्ष सुनिल चव्हाण, सतिश पालकर, कार्याध्यक्ष मनोज लेले, सचिव जमीर खलफे, कोषाध्यक्ष अजय सावंत , कार्यकारिणी सदस्य-अमोल मोरे, रहीम दलाल, प्रशांत हर्चेकर यांचा समावेश करण्यात आला आहे.