रत्नागिरी:- जिल्हाधिकारी यांचा मनाई आदेश लागू असताना मोर्चा काढल्या प्रकरणी मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह 125 ते 150 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवार 26 नोव्हेंबर रोजी मुदतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या वतीने राज्य शासनाने लॉकडाऊन काळातील वीज बील माफ करावी या मागणीसाठी पक्षाचे जिल्हाध्यक्ष जितेद्र चव्हाण व इतर कार्यकर्ते यांनी मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला. यावेळी जिल्हाधिकारी रत्नागिरी याचे मनाई आदेशाचा भंग केला तसेच जमलेल्या कायकर्ते यानी एकत्र येऊन घोषणाबाजी देऊन बेकायदेशीर जमाव करुन मोर्चा काढला. तसेच सध्या कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव वाढत चालला असुन ते माहीत असताना देखील सामाजिक अंतर न ठेवता आंदोलन करुन मा.जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी 16 नोव्हेंबर 2020 रोजी पासुन फौजदारी प्रकिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जारी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.