रत्नागिरी:- मध्य रेल्वे मार्गावर पनवेलनजीक घसरलेल्या मालगाडीमुळे कोकण रेल्वे वाहतुकीला चांगलाच फटका बसला आहे. काही गाड्यांचे वेळापत्रक विस्कटले आहे. काही गाड्या वळवण्यात आल्या आहेत तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
शनिवारी पनवेल येथे मध्य रेल्वेच्या मालगाडीचे डबे घसरले. ते बाजूला करण्याचे काम वेगाने सुरू आहे. मात्र त्यामुळे कोकण रेल्वेच्या वेळापत्रकाला चांगलाच फटका बसला आहे. काही गाड्या स्थानकांमध्ये थांबवूनच ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे वेळापत्रक बिघडले आहे. काही गाड्या रद्दच कराव्या लागणार आहेत. त्याबाबत निर्णय तासभरातच रेल्वे प्रशासन घेणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मेमू, तुतारी, मांडवी, कोकण कन्या, सीएसएमटी स्पेशल या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. गोवा संपर्क क्रांती, जनशताब्दी, नेत्रावती वळवण्यात आल्या आहेत.