मांडवी येथे मद्य प्राशन करणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील मांडवी येथील सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रशिद उमर मस्तान (३२) व हुजेफा यासिन मुकादम (३२) अशी मद्य प्राशन करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. ही घटना गुरुवारी (ता. ३०) रात्री आठच्या सुमारास मांडवी येथील रस्त्यावर निदर्शनास आल्या.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सार्वजनिक ठिकाणी विदेशी मद्य प्राशन करताना आढळले. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अमित पालवे व कौस्तुभ जाधव यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.