रत्नागिरी:- बेशुद्ध अवस्थेत असलेल्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. जैनेंद्र दयाशंकरसिंह (५०, रा. साई समर्थ अपार्टमेंट, मजगाव रोड रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ३१) सकाळी साडेनऊच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जैनेंद्र हे सकाळी साडेसहा वाजता पाणी पिऊन हॉलमध्ये बसलेले होते. त्यानंतर सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांच्या पत्नीचा फोन खबर देणार यांना आला. त्यांनी जैनेंद्र फोन उचलत नाहीत त्यांना जाऊन बघा त्यावेळी खबर देणार हे त्यांना पहाण्यासाठी गेले असता जैनेद्र यांची हालचाल होत नव्हती तात्काळ त्यानी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांना औषधोपचारापुर्वीच तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.