मंडणगड नगरपंचायत त्रिशंकू स्थितीत; अपक्षांचे महत्व वाढले

मंडणगड:- मंडणगड नगरपंचायतीच्या १७ प्रभागांची मतमोजणी करण्यात आली. त्यानुसार राष्ट्रवादी शिवसेनेचे महाआघाडीचे ७ उमेदवार, शिवसेना बंडखोर गटाचे शहर विकास आघाडीचे ७ उमेदवार यासह ३ अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.

त्यामुळे सत्ताकारणाची चावी अपक्षांचे हातात गेलेली असताना निवडणुकांचे तोंडावर करण्यात आलेल्या महाआघाडीचा प्रयोग शहरातील सुमारे ५० टक्के मतदारांनी नाकारलेला दिसून आला.
शहरातील मूळ शिवसेनेचे चारही अधिकृत उमेदवार या निवडणुकीत पराभूत झाले. त्यामुळे अधिकृत शिवसेनेचा शहरातील पत्ता साफ झालेला दिसून आला. याचबरोबर शिवसेनेच्या बंडखोर शहर विकास आघाडीने निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली.मतमोजणी शांततेत संपन्न होण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय अधिकारी भाग्यश्री मोरे, तहसीलदार नारायण वेगुर्लेकर, निवासी नायब तहसीलदार दत्तात्रय बेर्डे, पोलीस निरीक्षक शैलजा सावंत, उत्तम पिठे यांच्या नियोजनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.