मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील वाल्मिकीनगर येथे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास किराणा दुकान आणि मेडिकल स्टोअरला आग लागली. या आगीत दोन्ही दुकाने खाक झाली. या दुर्घटनेत सुमारे ७० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनामामध्ये नमूद केले आहे.
या संदर्भात महसूल प्रशासनाकडून करण्यात आलेल्या पंचनामामधील माहितीनुसार, वाल्मिकीनगर पीर मोहल्ला येथील यासीन आमदानी यांच्या रॉयल जनरल आणि किराणा स्टोअर्सला गुरुवारी आग लागली. या दुकानाजवळ असलेल्या मेडिकल स्टोअरला सुद्धा आग लागली. परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीमध्ये दोन्ही दुकानातील संपूर्ण फर्निचर – वस्तू खाक झाले.