मंडणगड:- दापोली मंडणगड परिसरात अवैधरित्या गुटखासदृश्य वस्तूंची वाहतूक व विक्री होत असल्याचे समोर आले आहे. मंडणगड पोलिसांनी 2 लाख 73 हजार 216 रूपये किंमतीचा गुटखा सदृश्य असलेला मुद्देमाल जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. या सगळ्याचे दापोली कनेक्शन असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. यापूर्वी खेड परिसरात अवैध गुटखा पदार्थांच्या वाहतूक करताना पकडण्यात आला होता त्यावेळीही या सगळ्याचे दापोली कनेक्शन असल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी संशयित आरोपी कमलाकर सागरमल गोयल (वय ४१, राहणार काळकाई कोंड दापोली) याला अटक करण्यात आली आहे.
या अंमली पदार्थांची वाहतूक होणार असल्याची गुप्त खबर मंडणगड पोलीस निरीक्षण शैलजा सावंत यांना मिळाली होती. त्यावरून १३ जानेवारी रोजी गुरुवारी ही मोठी कारवाई मंडणगड पोलिसांनी केली आहे. या कारवाईने दापोली मंडणगड परिसरातील पानमसाल्याच्या नावाखाली अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
या कारवाईत पुढील स्वरूपाचे अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. १८ हजार सातशे बारा रूपये किंमतीची विमल पान मसाला केशरी रंगाचे ४२ पाकीट,४ हजार सहाशे ऐशी रूपये किंमतीची केसरयुक्त विमल पान मसाला फिकट जांभळ्या रंगाचे पॅकीग असलेले ३९ पाकीट,६ हजार पाचशे पंचेचाळीस रूपये किंमतीची केसरयुक्त विमल पान मसाला फिकट जांभळा व लाल रंगाचे पॅकींग असलेले ३५ पाकीट, ११ हजार पंचावन्न रूपये वि-२ तंम्बाखू निळा लाल रंगाचे पॅकींग असलेले ३५ पाकीट, एक हजार दोनशे रूपये किंमतीची वि-१ तम्बाखू हिरव्या रंगाचे पॅकीग असलेली ४० पाकीट, नऊशे चोवीस रूपये वि- १ तंम्बाखू केशरी रंगाचे पँकींग असलेले ४२ पाकीट या वस्तूंचा समावेश आहे. दोन लाख पन्नास हजार रुपये एक महिंद्रा मँक्झिमो चार चाकी गाडी क्रमांक एम.एच ०८ / डब्लू / २६०७ ही ताब्यात घेण्यात आली आहे.
तारखेस वेळी व जागी यातील आरोपीत मजकूर हा महाराष्ट्र राज्य शासनाने जनहित व जन आरोग्याच्या दृष्टीकोनातून प्रतिबंधित केलेल्या वरील वर्णनांचा व किंमतीचा अन्नपदार्थ अवैधरित्या बेकायदेशिरपणे महीद्रां मँक्झीमो गाडी क्र एम.एच.०८ / डब्लू / २६०७ या चारचाकी वाहनातून ही अवैधरीत्या वाहतूक करण्यात येत होती. आला म्हणून.भा.द.वि. ३२८, २७२, २७३, १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणाची फिर्याद पोलीस हवालदार धनंजय शांताराम सावंत यांनी दाखल केली असुन अधिक तपास मंडणगड पोलीस करत आहेत.