भोके ते उक्षी दरम्यान महिलेची पर्स लांबवून लाखो रुपयांचा ऐवज लंपास

रत्नागिरी:- रेल्वे प्रवासादरम्यान महिलेची पर्स लांबवून अज्ञाताने लाखोंचा ऐवज लांबवला. ही घटना शुक्रवार 19 एप्रिल रोजी सकाळी 7 वा. सुमारास भोके ते उक्षी रेल्वेस्टेशन दरम्यान घडली आहे.

याबाबत महिलेच्या पतीने ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी सकाळी ते पत्नीसह दिवा पॅसेंजर रेल्वेने रत्नागिरी ते पनवेल असा प्रवास करत होते. त्यांची ट्रेन भोके येथे आाली असता फिर्यादींना जाग आली असता त्यांना आपल्या डोक्याखाली ठेवलेली पत्नीची पर्स चोरीस गेल्याचे लक्षात आले. पर्स मध्ये 1 लाख 20 हजार रुपयांचे अडीच तोळे वजनाचे मंगळसूत्र,6 हजार 500 रुपयांची रोख रक्कम, 500 रुपयांचे एअर मशिन, 500 रुपयांचा जुना मोबाईल,रेशन कार्ड, पासबुक, आधार कार्ड असा एकूण 1 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात भादंवि कायदा कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.