रत्नागिरी:- सरकारमान्य माडी विक्री केंद्रातून भेसळयुक्त माडी विक्री केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये हा प्रकार उघड झाला होता. मात्र भेसळ युक्त माडिचा अहवाल प्राप्त झाल्यानतंर अन्न व औषध प्रशासाने हा गुन्ह दाखल केला आहे.
वाटद-खंडाळा येथे जितेंद्र रवींद्र वझे (रा. सैतवडे), हेमंत तुकाराम मयेकर (रा. काळबादेवी) हे सरकारमान्य माडी विक्री केंद्र चालवतात. मात्र या केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाने तपासणी केली असता त्यामध्ये भेसळ असल्याचे दिसून आले. भेसळयुक्त माडी विक्री करत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे नोव्हेंबर २०२० मध्ये ही कारवाई झाली होती. माडीचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाला नुकताच प्राप्त झाला. माडीमध्ये भेसळ असल्याचे निष्पन्न झाल्याने या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने अन्न सुरक्षा अधिकारी दशरथ मारूती बांबळे यांनी ४ सप्टेंबरला २०२१ ही तक्रार दाखल केली आहे. जयगडचे सहायक पोलिस निरीक्षक श्री. कळेकर याचा अधिक तपास करीत आहेत.