भाट्ये येथे रिक्षा अपघातात चालक ठार

रत्नागिरी:- रत्नागिरी ते पावस रिक्षा घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकाची भाट्ये येथे बॅरिकेट्सला धडक बसली. या अपघातात चालक ठार झाल्याची घटना २४ फेब्रुवारी रोजी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. सुमारास घडली. रोहित रविकांत रांदपकर (४५. भाटीमिया, रत्नागिरी) असे ठार झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित हा आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच०८. एक्यु ४४०३) ही रत्नागिरी पावस रोडवरुन स्वतः चालवत घेऊन जात असताना भाट्ये येथील चेक पोस्टवर बॅरिकेट्सला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षा उजव्या बाजूला जाऊन पलटी झाली. यामध्ये रोहित दिपकर यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी रोहित यांच्यावर भावविकलम ३०४ (अ), २७९ ३३७, ३३८ मीटर वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे