रत्नागिरी:- शहरालगतच्या भाट्ये झरीविनायक मंदिर येथे कार व दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत दोघेजण जखमी झाल्याची घटना सोमवार 8 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. दोन्ही जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद रत्नागिरी शहर पोलिसात करण्यात आली आहे.
श्रेया लिंगायत ( ३५ ) व सोहम लिंगायत ( १४ , रा . दोन्ही फणसोप , रत्नागिरी ) अशी जखमींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रेया लिंगायत या आपल्या ताब्यातील दुचाकीवरून रत्नागिरी ते फणसोप असा प्रवास करत होत्या. त्यांच्या मागच्या सीटवर सोहम बसला होता. भाट्ये झरिविनायक मंदिराजवळ त्यांच्या दुचाकीला कारने धडक दिली. यामध्ये दोघंही जखमी झाले. याबाबतची तक्रार श्रेया यांनी शहर पोलीस स्थानकात दिली.