भाट्ये अपघातप्रकरणी दुचाकी स्वाराविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:– पावस ते रत्नागिरी रस्त्यावर भाट्ये येथे दुकानासमोर दोन दुचाकींमध्ये अपघात झाला. स्वतःच्या मरणास व इतरांच्या दुखापतीस कारणीभूत झालेल्या स्वाराविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनायक गजानन जाधव (वय ३२, रा. कुर्धे-पावस, ता. रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. ही घटना २५ डिसेंबरला भाट्ये रस्त्यावर घडली होती. विनायक जाधव हे दुचाकी घेऊन पावसहून रत्नागिरीकडे येत होते. त्यावेळी जुबेर मकबुल माजगावकर हेही दुचाकीवरून जात असताना हा अपघात घडला.