भरधाव दुचाकीची कारसह एसटीला धडक

रत्नागिरी:- दुचाकी निष्काळजीपणे चालवून मोटारीला बाजू देऊन पुढे जात असताना स्वाराने एसटीला समोरुन धडक दिली. या अपघातात स्वतःच्या दुखापतीस कारणीभूत झालेल्या स्वाराविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

,,गणेश प्रकाश सावंत (४१, रा. राई, रत्नागिरी) असे संशयित स्वाराचे नाव आहे. ही घटना ३१ जानेवारीला सकाळी सव्वा दहाच्या सुमारास जाकादेवी ते राई जाणाऱ्या रस्त्यावर विल्ये गावातील डावखोल फाट्याच्या अलिकडे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित गणेश सावंत हा दुचाकी (क्र. एमएच-०८ एमडी ७१२२) घेऊन जाकादेवी ते राई असा जात होता. राई गावात जाणाऱ्या रस्त्यावर विल्ये गावातील डावखोल फाट्याचे अलिकडे दुचाकी निष्काळजीपणे चालवून मोटारीला ओव्हर टेक करुन पुढे जात असताना समोरुन येणाऱ्या एसटी (क्र. एमएच-२० बीएल १६६०) ला धडक दिली. या अपघातामध्ये तो स्वतःच्या दुखापतीस कारणीभूत झाला. या प्रकरणी सहायक पोलिस फौजदार महेश टेमकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.