रत्नागिरी:- वादळी वारा आणि लाटांच्या तडाख्यात सापडलेले बार्ज अखेर पांढरा समुद्र येथील धुप प्रतिबंधक बंधाऱ्यावर येऊन धडकले आहे. या बार्ज मध्ये 13 खलाशी असून त्यांच्या बचावासाठी बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. स्थानिक नागरिकही बचावकार्यात सहभागी झाले आहेत.
लाटांच्या तडाख्यात मिऱ्या समुद्र किनाऱ्यानजिक नांगरून ठेवलेले बार्ज सापडले. वादळी वारे आणि लाटांच्या तडाख्यात बार्ज भरकटले. वादळा सोबत समुद्राला आलेल्या भारतीने किनारपट्टी भागात लाटांचे तांडव सुरू आहे. या तडाख्यात एक बार्ज सापडले. हे बार्ज भगवती बंदर येथे नांगरून ठेवण्यात आले होते. मात्र लाटांच्या तडाख्याने नांगर तुटल्याने बार्ज भरकटले. भगवती बंदर येथून भरकटलेले जहाज लाटांच्या तडाख्याने पांढरा समुद्र किनाऱ्यानजिक पोचले. समुद्राच्या भरतीसोबत हे बार्ज जाऊन किनाऱ्यावर उभारलेल्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर जाऊन आढळले. सुदैवाने यात बार्जचे नुकसान झाले नसून बार्जसह खलाशांच्या बचावासाठी काम सुरू आहे.