बोलेरो पिकअप- ट्रकमध्ये जोरदार धडक; दोन ठार तर एक गंभीर

खेड:- मुंबईकडून देवगड दिशेकडे जाणारी बोलेरो पिकअप कशेडी घाटानजिक मौजे भोगाव संत तुकाराम मंदिर येथे रात्री 12.45 वा. आली असता जयगड ते ठाणे मुंबईकडे जाणारा ट्रक यांच्यात समोरासमोर ठोकर होऊन गंभीर अपघात झाला. या अपघातात दोनजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. 

अपघातानंतर पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या  अपघातातील दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरात ठोकर झाल्याने बोलेरो पिकअप मधील इसम तुषार प्रकाश चव्हाण (वय -24, रा. नारिंग्रे तालुका देवगड) व  निलेश मनोहर शेटये (वय-36, या.मुंडगे,रा.देवगड) हे दोघे गंभीर दुखापत होऊन जागीच मयत झालेले आहेत.  तसेच उमेश उमेश उत्तम कोरडे (वय- 24 राहणार देवगड) यांना गंभीर दुखापत झाली आहे. 

अपघातातील दोन्ही वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातस्थळी अपघातातील दोन्ही वाहने रस्त्याचे बाजूला करून वाहतूक सुरळीत चालू करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.