बोगस बियाणे, खते, किटकनाशके विक्रीवर आळा घालण्यासाठी भरारी पथकांची स्थापना 

रत्नागिरी:-खरीप हंगामात शेतकर्‍यांना दर्जेदार बियाणे मिळावे यासाठी भात बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी, युरीया ब्रिकेटस्सह सिंगल सुपर फॉस्पेटचा सुयोग्य वापर, बीजप्रक्रिया, आंबा बागांचे भौगोलिक मानांकन हे कृषी विभागाचे कार्यक्रम मोहिम स्वरुपात राबवतानाच बोगस बियाणे अथवा खते, किटकनाशके विक्रीवर आळा घालण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आल्याचे कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

खरीप हंगामाच्या पुर्वतयारीच्या नियोजनासाठी रत्नागिरीतील अल्पचबचत सभागृहात एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुर्‍हाडे, कृषी विकास अधिकारी अजय शेंडे, शास्त्रज्ञ डॉ. वैभव शिंदे, भात संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ विजय दळवी, पणनचे मिलिंद जोशी उपस्थित होते.

यामध्ये येत्या खरीप हंगामात राबविण्यात येणारे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, भात व नागली या पिकांच्या लागवडीचे तंत्रज्ञान, सुधारीत संकरित वाणाचे बियाणे आदी विषयी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाच्या शिरगाव येथील कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. विजय दळवी यांनी मार्गदर्शन केले. येत्या हंगामात विविध फळझाडांची लागवडीची माहिती रोग-किडींबाबत डॉ. वैभव शिंदे यांनी माहिती दिली. सध्या सुरु असलेल्या आंबा हंगामात निर्यातीविषयी काय केले पाहीजे याबाबत पणनचे सहाय्यक सरव्यवस्थापक मिलिंद जोशी यांनी माहीत सांगितली.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळझाडे लागवडीचे 5 हजार हेक्टर क्षेत्राचे उदृदीष्टय साध्य करण्याबाबत नियोजन करण्यात आले. येत्या हंगामात बी-बियाणे, खते आदी उपलब्धेबाबत अजय शेंडे यांनी मार्गदशन केले. बोगस बियाणे अथवा खते, किटकनाशके याला आळा घालण्यासाठी भरारी पथकांची स्थापना कृषी विभागाकडून करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या लघू व सुक्ष्म उद्योग योजनेांतर्गत प्रस्ताव सादर करण्याबात उर्मिला चिखले यांनी शेतकर्‍यांना आवाहन केले आहे. त्यासाठी पुरक प्रस्ताव शेतकर्‍यांकडून भरुन घेण्याच्या सुचना सुनंदा कर्‍हाडे यांनी केल्या. तसेच या कार्यशाळेत कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत माहिती दिली. उपस्थित कर्मचार्‍यांना केल्या आहेत. आजच्या या एकदिवसीय खरीप हंगाम नियोजन पुर्वतयारीच्या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील सर्व कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागिय कृषी अधिकारी उपस्थित होते. या कार्यशाळेपासून येत्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारी कृषी विभागाने सुरुवात केली आहे.