बोगस जिल्हाधिकारी बनून त्याने केले निवृत्त पोलिसाच्या मुलीशी लग्न केले

रत्नागिरी:- जिल्हाधिकारी झालो म्हणून गावभर सांगितले,गावकऱ्यांनी मिरवणूक देखील काढली. गुजरातमध्ये पोस्टिंग मिळाली आहे असे देखील सांगितले. वर्षातून एक-दोनदा अलीशान गाडीतून गावात यायचा. सर्वाना वाटले हा खरंच जिल्हाधिकारी झाला असेल. रत्नागिरीत बदली झाल्याचा बनावट आदेश काढले आणि जाळयात सापडला. गावात निवृत्त पोलिसाच्या मुलीशी संसार थाटल्याची माहिती समोर आली आहे. 

अर्जुन सकपाळ असे त्या तोतयांचे नाव आहे. तो कोल्हापूर येथील न्हाव्याचीवाडी येथील रहिवासी असून त्यांचे शिक्षण बीपी.एड झाले आहे. मागील सात वर्षांपासून तो अनेकांना फसवत आहे.त्यांनी कोल्हापूर पोलिसांना देखील चकवा दिला होता.

त्यांच्या या दिखाऊपणास कोल्हापुरातील एक निवृत्त पोलिस अधिकारी देखील बळी पडले. त्यांनी त्यांच्या मुलीचे मोठ्या थाटामाटात या तोतयांशी लग्न देखील लावून दिले. आता लवकरच महाराष्ट्रात बदली होणार आहे,असे सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या उपसचिवाच्या नावाने बनावट डिजिटल सही करून तीन अधिकाऱ्यांच्या बदलीचा खोटा आदेश तयार केला.

तो सोशल मिडियावर व्हायरलं केला. स्वतः रत्नागिरीचे नवे जिल्हाधिकारी असे देखील घोषित केले.अनेकदा पोलिसांना देखील चकवा दिला. शेवटी रत्नागिरी पोलिसांनी सापळा रचून या तोतया जिल्हाधिकाऱ्यास बेड्या ठोकल्या आहेत.