बेपत्ता प्रसन्ना दीक्षित यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ

लांजा:– बेपत्ता असलेल्या प्रसन्ना रामकृष्ण दीक्षित यांचा मृतदेह जंगलात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. घरगुती भांडणातून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

भाजपा पदाधिकारी असलेले प्रसन्ना दीक्षित हे लांजा येथील रावारी ब्राह्मणवाडी येथील रहिवासी होते.
घरगुती भांडणातून 12 ऑगस्ट पासून ते बेपत्ता झाले होते. त्यानंतर नातेवाईक आणि गावकऱ्यांनी शोध घेऊनही त्यांचा ठावठिकाणा लागला नव्हता. तब्बल दहा दिवसानंतर सोमवारी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यांचा मृतदेह रावारी आणि बापेरे गावच्या सीमेलगत असलेल्या जंगलात आढळला.