रत्नागिरी:- बेदरकारपणे दुचाकि चालवून पादचारी महिलेस धडक देत अपघात केल्याप्रकरणी चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघाताची ही घटना बुधवार ५ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वा.उद्यमनगर येथे घडली आहे.हुसैन नाझीम हकिम (२०,रा.धनजी नाका, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्याविरोधात अमोल अनंत अवेरे (३३, रा.उद्यमनगर झाडगाव एमआयडीसी) यांनी तक्रार दिली आहे.त्यानूसार,बुधवारी सायंकाळी ६ वा.त्यांची आई गिरणीवर दळण टाकून घरी येत होत्या.त्याचवेळी हुसैन हकिम आपल्या ताब्यातील अॅक्सेस दुचाकी (एमएच-०८-एव्ही-६२५५) घेउन जात असताना त्याने अमोल अवेरे यांची आई अमिता अवेरे(५७) यांना धडक देत अपघात केला. तसेच अपघात झाल्यावर खबर न देता पळून गेला होता.याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस फौजदार टेमकर करत आहेत.