बेकायदेशीर जुगार चालवणाऱ्या विरोधात गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील चांदेराई येथे बेकायदेशिरपणे जुगार खेळ चालवणार्‍या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई मंगळवार 23 मे रोजी दुपारी 3.30 वा.करण्यात आली आहे.

संतोष विश्वनाथ सुर्वे (53, रा.चांदेराई, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित प्रौढाचे नाव आहे.मंगळवारी ग्रामीण पोलिसांचे पथक चांदेराई परिसरात गस्त घालत असताना त्यांना चांदेराई नदी किनारी असलेल्या आंब्याच्या झाडाखाली एक प्रौढ बेकायदेशिरपणे जुगार खेळ चालवत असताना मिळून आला.पोलिसांनी त्याच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे इतर साहित्य असा एकूण 292 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.