बॅंकेच्या कार्यालयीन कामात अडथळा; संशयिताविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- बॅंकेच्या कार्यालयात काम करत असताना शिवीगाळ करुन कामात अडथळा करणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनंत गजानन शिंदे असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ३) दुपारी अडीच ते सायंकाळी पावणेसातच्या सुमारास युको बॅंक रत्नागिरी व नवलाई मंदिर नाचणे येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी रविकिरण बालासाहेब टेळे हे त्यांचे बॅंकेच्या कार्यालयामध्ये कामकाज करत असताना संशयित सहकर्जदार अनंत शिदे हे बॅंकेत येऊन तुम्ही मला नोटीस का दिली. तुम्हाला काय अधिकार असे बोलून शिवीगाळ करुन बॅंकेच्या कामात अडथळा निर्माण केला. व तेथून ते निघून गेले. त्यानंतर सायंकाळी पावणेसात च्या सुमारास फिर्यादी बालासाहेब टेळे हे बॅंकेतून घरी जात असताना संशयित शिंदे हे पाठीमागून येऊन त्यांच्या गाडीसमोर गाडी आडवी घातली व टेळे यांच्या कानफटात मारली तसेच शिवीगाळ करुन पुन्हा माझ्या वाटेत या तर लक्षात ठेवा अशी धमकी दिली. या प्रकरणी रविकिरण टेळे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.