बिल जमा करण्याच्या बहाण्याने 99 हजारांची ऑनलाईन फसवणूक

रत्नागिरी:- फर्निचरचे बिल जमा करण्याच्या बहाण्याने तरुणाची तब्बल 99 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.ही घटना गुरुवार 8 जुलै रोजी दुपारी 3.51 ते 6 वा. कालावधीत घडली. साहिल कुमार आणि मनजीत अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात प्रवीण बबन पवार (34, रा.गोळप, रत्नागिरी ) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

त्यानुसार,संशयितांनी पवार यांच्या गुगल पे अकाउंटवर लिंक पाठवून फर्निचरचे बिल जमा करण्याच्या बहाण्याने त्यांच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने 49 हजार आणि दोनवेळा 24 हजार 985 असे एकूण 98 हजार 970 रुपये काढून फसवणूक केली.अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.