रत्नागिरी:- तालुक्यातील बावनदी येथील दुकान टपरीच्या मागील बाजूस चालणाऱ्या मटका-जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ३०० रुपयांची मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करुन नोटीस देण्यात आली आहे.
जयेंद्र बाबू कांबळे (रा. पांगरी बौद्धवाडी, ता. संगमेश्वर, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयिताकडे विनापरवाना मटका जुगाराचे साहित्यासह ३०० रुपयांचा मुद्देमाल सापडला. या प्रकरणी पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.