खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील नातूनगर येथे पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या खासगी आरामबसला पिकअप व्हॅनने पाठीमागून दिलेल्या धडकेत आदिती ब्रिजेश डिंगणकर हिचा जागीच मृत्यू झाल्याप्रकरणी पिकअप व्हॅनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विश्वास धोंडिराज देसाई (५९, रा. मालाड) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. तो टेम्पो (एमएच ४- केएफ- ८५४७) घेऊन जात असताना नातूनगर फाटा येथे पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या खासगी आरामबसला (एमएच ४८- बीएम- १३४०) पाठीमागून धडक दिली. बसच्या उजव्या बाजूस मागून दोन नंबरच्या खिडकीजवळ बसलेल्या आदिती डिंगणकर ही सात वर्षीय बालिका जागीच ठार झाली. बसमधील अन्य एक प्रवासीही किरकोळ जखमी झाला होता.