रत्नागिरी:- बहिणीला आणायला रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला बांधखिंड येथे अपघात झाला. या अपघातात कासारवेली येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश सोलकर (वय अंदाजे ३२ रा. लक्ष्मीनारायण वाडी कासारवेली) हा बुधवारी पहाटेच्या सुमारास आपल्या बहिणीला आणण्यासाठी रेल्वेस्टेशनला दुचाकी घेऊन निघाला होता. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास त्याची दुचाकी बांधखिंड येथे आली असता त्याच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात यश याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती अद्याप मिळालेली नाही. अपघाताची नोंद शहर पोलीस स्थानकात करण्यात आली असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.