रत्नागिरी:- सार्वजनिक बांधकाम विभागातील वादग्रस्त कर्मचारी अशोक नाचणकर यांच्याविरोधात सुरु असलेला तपास लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी रत्नागिरी जिल्हा काँन्ट्रेक्टर असोसिएशनच्यावतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला निवेदन देऊन करण्यात आली.
उत्तर रत्नागिरी विभाग आणि चिपळूण सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत अनेक ठेकेदार नियमानुसार ठेके घेऊन कामे करीत आहेत. मात्र बांधकाम विभागातील सेवानिवृत्त व निलंबित करण्यात आलेले अशोक नाचणकर हे ठेेकेदारांच्या विरोधात कामांमध्ये नाहक अर्ज करुन त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. चुकीच्या व विपर्यास्त बातम्यांमुळे ठेकेदारांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. निवृत्त व निलंबित भांडारपाल यांची कारकिर्द वादग्रस्त असून अशा व्यक्ति विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सुरु असलेलला तपास वेगाने करावा अशी मागणी रत्नागिरी जिल्ह्यातील ठेकेदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला निवेदन देऊन केली. यावेळी मोठ्या संख्येने ठेकेदार उपस्थित होते.