बस- रिक्षाच्या धडकेत चालकाचा जागीच मृत्यू

दापोली:- एसटी बस आणि रिक्षाची समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला. सुरेश पाटील (रा. कोंढे, मूळ गाव असोंड) असे मृत चालकाचे नाव आहे. हा अपघात उन्हवरे पोलीस बिटातील उर्फीनजीक आज (दि. १६) दुपारी दीडच्या सुमारास झाला.

अधिक माहिती अशी की, आज दुपारी उर्फीकडून फणसूकडे सुरेश पाटील रिक्षा घेऊन निघाले होते.तर दापोलीकडून पांगारीकडे (एमएच २० बी- एल १५६६) बस निघाली होती. यावेळी बसची आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर कोंढे गावातील आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा पंचनामा दापोली पोलिसांनी केला.

दरम्यान, महिन्याभरातील हा दुसरा अपघात आहे. या आधी याच मार्गावर पांगारी गाडीचा अपघात दाभिळ येथे झाला होता. या अपघातात देखील एकाचा मृत्यू झाला होता.