बसमध्ये चढताना पर्स लांबवली; 20 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल लंपास

रत्नागिरी:- बसमध्ये चढताना महिलेची पर्स लांबवल्याची घटना घडली आहे. पर्समधील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 20 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने लांबवला. ही घटना बुधवारी 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.50 वा.सुमारास रत्नागिरी ते चिपळूण एसटीतून वांद्री येथे जाताना संघविज दुकानासमोरील स्टॉप ते जिल्हा परिषद स्टॉप दरम्यान घडली आहे.

याबाबत शेफाली राजेश हळदणकर (42,रा.वांद्री भंडारवाडी,रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.त्यानूसार बुधवारी सायंकाळी त्या संघविज दुकानाच्या समोरील स्टॉपवर रत्नागिरी ते चिपळूण एसटीतून वांद्रीत जाण्यासाठी बसल्या.तिकिटाचे पैसे देण्यासाठी त्यांनी आपली मोठी पर्स उघडली असता त्यांना त्यातील छोटी पर्स मिळून आली नाही.त्या पर्समध्ये 14 हजार रुपयांची 13 ग्रॅमची सोन्याची चेन,6 हजारांचे 8 ग्रॅमचे ब्रेसलेट आणि रोख 800 रुपये असा एकूण 20 हजार 800 रुपयांचा ऐवज होता.तो अज्ञाताने लांबवल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक चव्हाण करत आहेत.