बसणी येथे दोन बसची समोरासमोर धडक; मोठा अपघात टळला

रत्नागिरी:- तालुक्यातील बसणी येथे दोन बसची समोरासमोर धडक झाली. शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातग्रस्त एका बसच्या समोरील काचा फुटून चालकाला थोडी दुखापत झाली होती. बसणी येथील वळणावर चालकांना अंदाज न आल्याने आणि मुसळधार पाऊस असल्याने अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. चालक व्यतिरिक्त अन्य कोणी प्रवासी जखमी झाल्याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.