रत्नागिरी:- बलात्कार प्रकरणातील संशयित आरोपीला न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. घराशेजारी राहणाऱ्या महिलेला गुंगीचे औषध देऊन जबरदस्ती ने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आरोपी याच्या विरोधात करण्यात आला होता.
मुंबई येथे आरोपीच्या घराशेजारी राहणाऱ्या महिलेसोबत आरोपीची ओळख झाली व त्यानंतर आरोपी पिडीत महिलेला रत्नागिरी येथील मालगुंड येथे एका हॉटेलमध्ये घेऊन आला आणि गुंगी येणारे शीतपेय देऊन आरोपीने महिलेवर मनाविरुद्ध जबरदस्तीने शरीरसंबंध केले. तसेच तिचे फोटो काढले अशी फिर्याद पिडीत महिलेने जयगड पोलीस ठाणे येथे नोंदवली होती.
आरोपी राजेंद्र वासुदेव पंडित (वय ५६ रा.मुबई) याचे विरोधात भा. द .वी. कलम ३७६(१), ३२८,४२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी महिलेला आरोपीने शेवटपर्यंत साथ देईन, असे वचन दिले होते. असे देखील फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले होते.
आरोपी पंडित यांनी ॲड.मनिष नलावडे यांच्या मार्फत रत्नागिरीचा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळणेसाठी अर्ज दाखल केला होता. सदर जामीनकामी ॲड.नलावडे यांनी आरोपी आणि फिर्यादी संमतीने हॉटेलमध्ये राहिले, तसेच त्यांचे पूर्वीपासून संबंध होते. फिर्यादी हिने आरोपीला बदनाम करणेसाठी आणि खोटा दबाव निर्माण करणेसाठी खोटी फिर्याद आरोपी विरोधात दाखल केली असल्याचा युक्तिवाद मांडला व मा.मुंबई उच्च न्यायालयाचे दाखले व फिर्यादी यांचा विरोधात पुरावा न्यायालयात दाखल केला.
ॲड.मनिष नलावडे यांचा सदर युक्तिवाद ग्राह्य मानून रत्नागिरीचे मा.जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीची २५ हजार रुपयांच्या अटकपूर्व जामिनावर सुटका करण्याचे आदेश प्रारीत केले. आरोपीच्यावतीने ॲड.मनिष नलावडे, ॲड.तनया सावंत यांनी या जामीनअर्ज कामी काम पाहिले