फ्लॅटचा ताबा नाही, २ बांधकाम
व्यावसायिकांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- फ्लॅटसाठी साडेपाच लाख रुपये घेऊन तब्बल दहा वर्ष फ्लॅटचा ताबा न देता फसवणूक केल्याप्रकरणी शहरातील बांधकाम व्यावसायिक गिरीष ओसवाल व महेश नवाथे यांच्याविरोधात शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , प्रवीण चवंडे ( रा . मुंबई , मूळ रा . चवंडे वठार , रत्नागिरी ) यांनी फिर्याद दिली आहे . प्रवीण चवंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गिरीष ओसवाल , महेश नवाथे या बांधकाम व्यावसायिकांना त्यांनी ६ ऑक्टोबर २०११ ते १३ जानेवारी २०१२ या कालावधीत मिरजोळे पडवेवाडीतील शांती के . एफ . ओसवाल प्लाझामध्ये फ्लॅट बुकींगसाठी ५ लाख ४७ हजार रुपये दिले होते . मात्र तब्बल १० वर्षांनंतरही फ्लॅट न दिल्यामुळे चवंडे यांनी फसवणूक झाल्याची तक्रार शहर पोलीस स्थानकात दिली आहे . त्यानुसार शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .