फ्लिपकार्टच्या नादात झाडगाव मधील तरुणीने गमावले 1 लाख

रत्नागिरी:- फ्लिपकार्ट संबंधी समस्यांचे निवारण करण्याच्या बहाण्याने ऍप डाउनलोड करण्यास सांगून त्याद्वारे तरुणीची 1 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.ही घटना मंगळवार 1 मार्च रोजी दुपारी 12.20 वा. झाडगाव येथे घडली.

निकिता संतोष गिरकर (24,रा.जोशी आर्केड झाडगाव, रत्नागिरी ) हिने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, मंगळवारी दुपारी फ्लिपकार्ट केअर सेंटर संदर्भात येणाऱ्या अडचणीबाबत तिने फोन केला होता. बोलणाऱ्या अज्ञाताने तिला एनी डेस्क ऍप डाउनलोड करण्यास सांगून त्याचा युजर आयडी मागून घेतला. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन निकिताने आयडी सांगितला असता तिच्या खात्यातून 1 लाख रुपये काढून तिची ऑनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक विनीत चौधरी करत आहेत.