रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस कोंड्ये येथे गावात बिबट्यांचा रस्त्यावर वावर असल्याचे दिसून आले आहे. यामुळे गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.
या मार्गावर रिक्षा चालकांना फुणगुस कोंड्ये येथील गेट समोर दोन बिबटे वावरताना दिसून आले. या ठिकाणी आठ दिवसातून हे बिबटे दिसून येतात असे बोलले जात आहे. जवळपास 4-5 बिबटे या ठीकाणी आहेत असे येथील ग्रामस्थ सांगत आहेत. रत्नागिरी 24 न्यूज वर सर्वात आधी बातमी वाचा. या बिबट्यांच्या वावरामुळे गावातील लोक आणि वाहन चालक रात्रीच्या वेळी बाहेर पडण्यास घाबरतात. त्यामुळे या बिबट्यांचा वन विभागाने बंदोबस्त करावा आणि नागरिकांना या भीतीपासून सुटका करावी अशी मागणी होत आहे.