रत्नागिरी:- कोकण रेल्वेतून विनातिकिट प्रवास करणार्या प्रवाशांविरोधात कोकण रेल्वेने कडक पावले उचलली आहे. विनातिकिट प्रवास करणार्या प्रवाशांवर कारवाईसाठी विशेष अभियान सुरु केले असून डिसेंबरमध्ये ६ हजार ६७५ फुकट्या प्रवशांकडून १ कोटी ९५ लाख ६४ हजार ९२६ रु.चा दंड वसूल केला आहे.ती ऑक्टोबर ते डिसेंबर या तिन माहितन्यात तब्बल ५ कोटी ६० लाख ९९ हजार ०१७ रु. दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे आता फुकट्या प्रवाशांचे धाबे दणाणले आहेत.
गेल्या तिमाहीत ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ एकूण १८,४६६ अनधिकृत,अनियमित प्रवासी तिकिटांशिवाय आढळून आले आणि त्यांना दंड करण्यात आला. एकूण ५ कोटी ६० लाख ९९ हजार ०१७ रु. दंड वसूल करण्यात आला.कोकण रेल्वे प्रवाशांना गैरसोय टाळण्यासाठी योग्य आणि वैध तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.